न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आंबोली मुख्य धबधब्यावर सुरक्षेसाठी बांबूचे मोडके सुरक्षा कवच

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी जगभरातून हजारो पर्यटक दरवर्षी पर्यटनासाठी येतात. आंबोली येथील मुख्य आकर्षण म्हणजे डोंगरातून कोसळणारे धबधबे हे आहे. मात्र शासनाच्या दुर्लक्षामुळे आंबोली मुख्य धबधब्याच्या ठिकाणी आताची परिस्थिती पाहता पर्यटन क्षेत्राची लाजीरवाणी स्थिती बनली आहे, असे म्हणणे गैर होणार नाही. मुख्य धबधब्यावर सुरक्षेसाठी बांबूचे मोडके सुरक्षा कवच तयार करून आपला नाकर्तेपणा शासनाने दाखवला आहे. पर्यटन विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उभारलेले हे बांबूचे सुरक्षा कवच म्हणजे सिंधुदुर्ग पर्यटन विभागाची वेशीवर टांगलेली लक्तरेच आहेत, अशी संतापजनता प्रतिक्रिया सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केली आहे. मुख्य धबधबा परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून येथील परिसर गलिच्छ झाला आहे. सिंधुदुर्ग वनविभाग, सिंधुदुर्ग पर्यटन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. आंबोली मध्ये येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची सुरक्षा फार महत्वाची आहे. अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे