न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा शिलान्यास

कोल्हापूर/ वृत्तसंस्था

करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर विकास आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिलान्यास झाला. 1445.97 कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मंदिर जतन, वारसा संवर्धन, भाविकांसाठी आधुनिक सोयी आणि धार्मिक पर्यटनाचे संवर्धन यावर भर देण्यात आला आहे. पहिला टप्प्यात टप्प्यात मूळ मंदिराचे संवर्धन, विद्युतीकरण व सुरक्षा व्यवस्थेसाठी उल्हाणापूर्वक कामे सुरू असून एकूण 28058 चौरस मीटर भूसंपादनाचे काम देखील प्रगतीपथावर आहे. दर्शन मंडप, अन्नछत्र, शौचालय, दुकाने, अँफिथिएटर, माहिती केंद्र आणि मोठ्या वाहनतळासह परिसराचे सर्वांगीण नूतनीकरण करण्यात येणार आहे. हा आराखडा कोल्हापूरच्या सांस्कृतिक व धार्मिक ओळखीस जागतिक स्तरावर उन्नती देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे