मलकापूरात भर उन्हात पेट्रोल, डिझेल साठी उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना उबाठाकडून मेलोडी चॉकलेटचे वाटप
बुलढाणा/
बुलढाणा जिल्ह्यात अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टर मध्ये डिझेल मिळत नसल्याने भर उन्हात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन व इतरही वाहन चालक रांगा लावून उभे आहेत मात्र देशाचे पंतप्रधान विदेशात मेलोडी चॉकलेट वाटप करत आहेत… असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटाने मलकापूर येथील पेट्रोल पंपावर रांगेत उभे असलेल्या वाहन चालकांना व ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना मेलोडी चॉकलेटचा वाटप करत उपरोधिक आंदोलन केल आहे.”


