बुलढाणा जिल्ह्यात तापमान ४६ वर.. दुपारचे रस्ते निर्मनुष्य
बुलढाणा/
बुलढाणा जिल्ह्यात यंदा उष्णतेने विक्रमी पातळी गाठली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्याचे घाटाखाली आणि घाटावर असे दोन भाग पडतात. घाटावरील भागात तापमान 43 ते 44 अंशांपर्यंत पोहोचले असून घाटाखालील भागात तापमान 45 ते 46 अंशांपर्यंत गेले आहे.
प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.”


