अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू तर तीन गंभीर
गडचिरोली/ वृत्तसंस्था
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनी़चा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.तर तीन विद्यार्थिनी गंभीर आहेत. आज पहाटे हा घटना घडली.या घटनेमुळे तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


