न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पुढील पिढीला मालवणी भाषेचा वारसा समजावून सांगणे हे आपले कर्तव्य .‌‌.. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

सावंतवाडीची भूमी कला-साहित्याची पंढरी असून शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या भूमीने महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. आजच्या डिजिटल युगात पुढच्या पिढीला आपली मूळ संस्कृती आणि मालवणी भाषेचा वारसा समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी नगर परिषदेच्या सहकार्याने ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मालवणी करंडक’ एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी रात्री श्री. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
श्री. दळवी पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य केंद्र होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. यावर्षीचा नाट्य महोत्सव वेंगुर्ल्यात घेण्यास त्यांनी अनुकुलता दाखविली आहे. श्री. दळवी यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर,दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर,मालवणी करंडक महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर, उपाध्यक्ष तथा पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संचालक रूजूल पाटणकर, मालवणी कवी दादा मडकईकर, नगरसेवक सुकन्या टोपले, नीलम नाईक, सुनीता पेडणेकर, सिद्धार्थ भांबूरे, सतीश पाटणकर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संतोष सावंत, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गावस उपस्थित होते.
​ यावेळी मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने वाढण्यासाठी नाट्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली.​ कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. रुजूल पाटणकर यांनी प्रास्ताविक करताना नवीन कलाकार घडवण्यासाठी हे व्यासपीठ पुन्हा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीच्या सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकला. या सोहळ्याला नगरसेविका दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, आनंद नेवगी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर आणि सुधीर आडीवरेकर यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी रील स्टार गौरी बांदेकर पद्मा वेंगुर्लेकर,भारती परब, मालवणी कवी रामदास पारकर,जादूगार वैभव कुमार ज्येष्ठ नाट्य कलाकार कल्पना बांदेकर माजी नगरसेवक संजय पेडणेकर आदींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले, तर आभार अमोल टेंबकर यांनी मानले.यावेळी सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर,आनंद काष्टे, निखिल माळकर, सौ. सावली पाटकर, हेमंत पांगम, साहिल सावंत, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिद्धेश नेरुरकर, प्रशांत सावंत, मृणाल चेंडके,हर्ष जाधव,अक्षय माशाळ,सर्वेश मोरजकर आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे