नोटा घेऊन जाणार लष्कराच विमान कोसळून 15जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था
खराब हवामानामुळे बोलिव्हियामध्ये लष्कराचे विमान कोसळले. नव्या चलनातील नोटा घेऊन जाताना खराब हवामानामुळे हरक्यूलिस सी-१३० विमानाचा अपघात झाला. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत. बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात हा अपघात झाला.
संरक्षण मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. नोटा घेऊन जाणारे आर्मीचे हरक्यूलिस सी-१३० विमान खराब हवामानामुळे शुक्रवारी संध्याकाळी एल अल्टोमध्ये रस्त्यावर कोसळले. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ३० जण जखमी झाल्याचे समजतेय. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे”


