पत्रकार रामचंद्र कुडाळकर यांना मातृशोक
सावंतवाडी/ प्रतिनिधी
होडावडे येथील रहिवाशी लक्ष्मीबाई दत्ताराम कुडाळकर (वय ७९) यांचे आज शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत कुडाळकर कुटुंबीयांचे सात्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे जावई असा परिवार आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष श्री. रामचंद्र कुडाळकर यांच्या त्या मातोश्री.


