न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

एमएचटी-सीईटी २०२६ : मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी २०२६ मार्गदर्शन व रणनीती कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा महेश ट्युटोरियल्स, मुंबई व एसकेई कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भोसले नॉलेज सिटी येथील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडणार आहे.

या कार्यशाळेत शिक्षणतज्ज्ञ व शैक्षणिक सल्लागार डॉ.संतोष शर्मा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच गणित विषयासाठी प्रा.राहुल घाडगे, रसायनशास्त्रासाठी प्रा.दीपक आमुंदकर आणि भौतिकशास्त्रासाठी प्रा.सचिन कदम हे विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेची सखोल तयारी, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, प्रश्नपत्रिकेचा कल समजून घेणे तसेच अधिक गुण मिळविण्यासाठी आवश्यक रणनीती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

१२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा पूर्णपणे विनामूल्य आहे. सावंतवाडी बसस्थानका जवळून महाविद्यालयापर्यंत संस्थेतर्फे बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी २७ फेब्रुवारी पूर्वी ७४४७६०५७९१, ९४०४१७३४०४, ९७६२३२७६४१ किंवा ९४०३६९८५४६ या क्रमांकांवर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे