न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडीत न.पा. सभेत ऑनलाइन असणा-या श्रद्धाराजेंच पॅकअप… उपनगराध्यक्षांना सभा चालविण्यास परवानगी… संजू परबांच्या आक्षेपानंतर प्रशासनाचा निर्णय

सिंधुदुर्ग/

भातुकलीचा खेळ सध्या सावंतवाडीत सुरू आहे.त्याचा पुनः एकदा प्रत्यय पहिल्या मासिक सभेत दिसून आला. ‘वैयक्तिक” कारणामुळे रजेवर असलेल्या नगराध्यक्षा  श्रध्दाराजेंनी ऑनलाईन द्वारे सभेत सहभाग दर्शविला त्याच वेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर हेही उभे राहून नगरसेवकांच्या प्रश्नावर उत्तरे देत होते…  सावंतवाडीच्या सोडाच राज्याच्या न.पा. इतिहासात प्रथमच एकत्र नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्ष एकाचवेळी सभा चालवत होते.

या प्रकाराला माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी तीव्र आक्षेप घेत एक तर ऑनलाईन मिटींग ठेवा आणि निरवडेकरांना बसवा किंवा ऑनलाइन बंद करा आणि निरावडेकरांना बोलायला द्या अशी मागणी केली.त्यास उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिले.त्यावर अखेर न.पा. प्रशासनाने श्रद्धाराजेंना पॅक अप करीत निरावडेकरांना सभा चालविण्यास दिले…‌ मात्र सावळ्या गोंधळामुळे न.पा. ची लक्तरे चव्हाट्यावर आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे