न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सिंधुदुर्गात मोटरसायकल रॅलीचे स्वागत

  सिंधुदुर्ग राजू तावडे 

भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलांमार्फत आयोजित राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीचे सिंधुदुर्गात स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

या रॅलीत लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक आणि गोवा येथील पोलीस अधिकारी, अंमलदार व रायडर्स सहभागी झाले आहेत. ‘फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या घोषवाक्याच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे आणि ड्रग्जमुक्त भारताचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी रॅलीत सहभागी झालेल्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि रायडर्स यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या रॅलीच्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती अभियानाला जिल्हा, राज्य आणि देशपातळीवर पाठबळ मिळेल. तसेच, ड्रग्जमुक्त समाज निर्माण करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासोबतच तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. या रॅलीमुळे अंमली पदार्थांविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळेल, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि एसएपी दीक्षित कुमार उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे