न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बंधाऱ्याच्या पाणीसाठ्याचा कुडाळ परिसरातील गावांना होणार लाभ

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

 संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन व जलसंधारणाच्या दृष्टीने कुडाळ बंधाऱ्याच्या फळ्या टाकण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या कामामुळे भंगसाळ नदीपात्रात पाणीसाठा होत असून, उपलब्ध जलसाठ्याचा कुडाळ शहरासह आजूबाजूच्या गावांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.

भंगसाळ नदीपात्रात पाणी अडविल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढण्यास, परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा होण्यास तसेच भूजल पुनर्भरणास मदत होऊ शकते. संभाव्य पाणीटंचाईच्या काळात हा जलसाठा महत्त्वपूर्ण ठरणार असून, कुडाळ शहर व परिसरातील गावांच्या पाणी उपलब्धतेला पूरक आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग करणे, पाण्याची नासाडी टाळणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, या दृष्टीने बंधाऱ्याच्या फळ्या टाकण्याच्या कामाला विशेष महत्त्व आहे. या उपाययोजनेमुळे भविष्यातील पाणीटंचाईचा संभाव्य परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.

जलसंपदा विभागामार्फत बंधाऱ्याच्या फळ्या टाकण्याचे काम सुरू असून, उपलब्ध पाणीसाठ्याचा परिसरातील नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा, यासाठी पाण्याचे नियोजन व संवर्धन महत्त्वाचे आहे. असे सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग आंबडपाल कुडाळ या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे