न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्गे वाहतूक पुर्णपणे बंद

कल्याण/ वृत्तसंस्था

माळशेज घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुसळधार पावसामुळे माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्याची घटना घडली. या घटनेनंतर माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.”

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण -माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ६१ मौजे करंजाळे गावाच्या हद्दीमध्ये रस्ता खचला. महामार्गावर रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता माळशेज घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे