सावंतवाडीत चित्रकार काका तेंडोलकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील सबनीस वाडा येथील काका तेंडोलकर यांच्या घराची भिंत कोसळली .. सुदैवाने यातून भाऊ हेमंत बालंबाल बचावले .
घराच्या मागील बाजूची भिंत कमकुवत झाली होती. मध्यरात्री अचानक ही भिंत ये-जा करणाऱ्या रस्त्यावर कोसळली. ही घटना रात्री घडल्याने मोठा अनर्थ टळला. भिंत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वी हेमंत तेंडोलकर त्या ठिकाणी गेले होते. मात्र, ते सुदैवाने बालंबाल बचावले.घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेच्या पर्यटन सभापती तथा या भागाच्या नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज राऊळ उपस्थित होते.


