सिंधुदुर्गातील वाहना दिलेला टोल माफीचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळावा: मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्ग जिल्हा पासिंगच्या वाहनांना टोल माफीचा दिलेला शब्द पालकमंत्र्यांनी पाळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांसाठी स्वतंत्र वाहतूक लाईन सुरू करावी. अन्यथा टोलनाक्याविरुद्ध मनसे उग्र आंदोलन उभारेल असा इशारा मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.
ओसरगाव येथील टोलनाका दिनांक १७ ऑगस्ट पासून चालू होत असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या टोलनाक्या बाबत अद्यापही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहन चालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. आता सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला असल्याने टोलचे पैसे आपण जेव्हा टोलनाका क्रॉस करतो तेव्हा ऑटोमॅटिक कट केले जातात. त्यामुळे रोख पैसे देण्याचे आता बंद झाले आहे. टोलनाक्याला जेव्हा जिल्हावासीवाय विरोध करत होते तेव्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी टोलनाक्यातून जिल्हावासियांना सूट देणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते. आता हा टोलनाका प्रत्यक्षरित्या चालू होत असल्याची बातमी आल्याने जिल्हावासियांच्या मनात पुन्हा चलबिचल निर्माण झाली असून पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाची आता पूर्तता करावी. अन्यथा जिल्हावासियांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार हाती घ्यावे लागेल असा इशारा मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.


