न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

राजेसाहेब शिवरामराजे भोंसले जन्मदिनानिमित्त श्री पंचम खेमराज महाविद्यालयात रक्तदान शिबिर

 

 सिंधुदुर्ग / राजू तावडे

      श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिज हायनेस श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या चेअरमन सौ शुभदादेवी भोंसले (राणीसाहेब),कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले, संस्थेच्या विश्वस्त व सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले,संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संस्थेचे संचालक प्रा.डी टी देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीच्या डॉ.मनीषा सावंत, प्राजक्ता रेडकर, रवींद्र लोहंबरे, मानसी बागेवाडी, अनिल खाडे, असलम शेख याचबरोबर ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, उपाध्यक्ष सौ. मीनल सावंत, सचिव श्री. बाबली गावंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, कार्यकारी सदस्य दीपक पटेकर व दिनेश गावडे आदी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरामध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. एस एम बुवा, डॉ. डी. बी. शिंदे, प्रा सौ. विभा गवंडे, एन.सी.सी. नेव्ही अधिकारी डॉ. विशाल अपराध, आर्मी अधिकारी डॉ. एस ए देशमुख, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रा.आर.बी. शिंत्रे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सी.ए.नाईक यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे