माजी मुख्य न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांच्या हस्ते ॲड. परिमल नाईक यांचा सत्कार
सिंधुदुर्ग / राजू तावडे
भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने दिलेल्या कोल्हापूर सर्किट बेंच (मुबई उच्च न्यायालय ) स्थापनेच्या योगदानाकरिता जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांना सन्मान पत्र देऊन कोल्हापूर येथे पहिल्या वर्धापन दीन सोहळ्यात गौरविण्यात आले. या प्रसंगी मुख्य न्यायमूर्ती (मुबई उच्च न्यायालय ) श्री. रवींद्र घुगे, न्यायमूती कर्णिक, न्यायमूर्ती कोलाबावाला, न्यायमूर्ती कुलकर्णी, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर सर्किट बेंच येथील सर्व सन्माननीय न्यायमूर्ती, बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा सदस्य, ॲडिशनल सॉलिसीटर जनरल श्री. अनिल सिंग, ॲडव्होकेट जनरल, महाराष्ट्र राज्य श्री. साठे, ॲड. संग्राम देसाई, सर्किट बेंच कृती समिती अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक, सहा जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष, न्यायाधीश व वकील वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.


