न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

य.च. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कौशल्यावर अधारीत कोर्स लवकरच सुरू:डॉ. संजय थोरात 

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे

      यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा लवकरच कौशल्यावर अधारीत कोर्स सुरू करण्याचा मानस असून ‘पोर्ट मॅनेजमेंट’ सारखे कोर्स सध्या उपलब्ध आहेत. प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ज्ञानगंगेत पुन्हा घेऊन येण हा आमचा मुख्य उद्देश असून ‘एआय’ चा वापर शिक्षणासाठी करण्यावरही भर आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रा. संजय थोरात यांनी दिली. सावंतवाडी येथील आरपीडी शाळेत बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रा. संजय थोरात म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) मान्यता असून मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवी ही इतर विद्यापीठाशी समकक्ष आहे. एक पदवी शिक्षणक्रम पूर्ण करताना अन्य शिक्षणक्रमांच्या माध्यमांतून आणखी एक पदवी अर्थात ड्युएल डीग्री मिळवीण्याची सुविधा या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी नाशिक येथे झाली आहे. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदव्या शासकीय सेवा आणि पदोन्नतीसाठी या ग्राह्य धरण्यासाठी शासन निर्णय आहे. इतर विद्यापीठातील अन्य शिक्षणक्रमांना या विद्यापीठातून घेतलेल्या पदवीनंतर पुढील उच्च शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून ८ विभागीय केंद्रे आणि १६७५ पेक्षा जास्त अभ्यासकेंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठाचे १४५ पेक्षा जास्त शिक्षणक्रम असून या शिक्षणक्रमांसाठी दरवर्षी साधारणपणे ३.७४ लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या विद्यापीठाचे बोधवाक्य “ज्ञानगंगा घरोघरी ” असून या विद्यापीठाने ज्ञानाची गंगा सर्वदूर पोहोचविली आहे. सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने मुक्त विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोल्हापूर विभागीय केंद्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगांव आणि गोवा सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी या विभागात एकूण १२० अभ्यासकेंद्रे सुरू असून या अभ्यासकेंद्रांवर जुलै २०२६ पासून ऑनलाईन पद्धतीने विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध शिक्षणक्रमांचे २२ अभ्यासकेंद्रे कार्यरत असून भविष्यात या जिल्ह्यात विविध शिक्षणक्रमांची अभ्यासकेंद्रे नव्याने सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे ycmou.digitaluniversity.ac.in किंवा ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रा. थोरात यांनी केले. यावेळी सहाय्यक सल्लागार विजयसिंह रजपूत, सावंतवाडी केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे