न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

हर घर तिरंगा रॅलीला खेडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी/ मेघेश मोंडकर

 खेडमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ९.३० वाजता रॅलीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज आणि भारत माता की जय.. वंदे मातरम.. च्या जयघोषाने संपूर्ण खेड शहर दुमदुमून गेले. या तिरंगा रॅलीमध्ये भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खेड तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, युवक, युवती, शहरातील देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांमध्ये रॅलीबाबत प्रचंड उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना पाहायला मिळाली. रॅली अत्यंत शिस्तबद्ध दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे