विकासाच्या कुठल्याही बैठकीसाठी आम्हाला बोलवत नाहीत… आम्ही पाकमधून निवडून आलोय काय? प्रमोद रावराणे यांचा सवाल
सिंधुदुर्ग / प्रतिनिधी
वैभववाडी तालुका पंचायत समिती सभागृहात आयोजित जलजीवन मिशन आणि पाणीटंचाई आढावा बैठकीत जि.प.सदस्य प्रमोद रावराणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘ विकासाच्या कुठल्याही बैठकीसाठी आम्हाला बोलवत नाहीत, आम्ही काय पाकमधून निवडून आलोय का’? असा सवाल केला. आणि गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले.



