यवतमाळमधील ७५ प्रकल्पामध्ये केवळ ३३ टक्के तर बुलढाण्यातील प्रकल्पात केवळ २२टक्केच पाणीसाठा
यवतमाळ/
यंदा एल-निनोच्या तीव्र प्रभाव आहे. राज्पायात पाऊस कमालीचा लांबणीवर पडलाय.
अशा बिकट परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 75 प्रकल्पांमध्ये केवळ 33% इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे.
भविष्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ नये
यासाठी शासनाने तातडीने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या असून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हाय अलर्ट वर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान
“बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या आजच्या जलाशय अहवालानुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून एकूण जलसाठा केवळ 22.37 टक्के शिल्लक आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख खडकपूर्णा धरणात शून्य टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला असून मृतसाठ्यावर परिस्थिती पोहोचली आहे.
नळगंगा व पेनटकळीसह अनेक प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरला आहे.
मान्सून अद्याप दमदारपणे सक्रिय न झाल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाले असून प्रशासनाने तातडीने नियोजन न केल्यास नागरिकांसह शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे”


