न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

पालकमंत्र्यांनी सांगितलेली मोठी रेघ भ्रष्टाचाराची ओढायची का ? डॉ. परूळेकर यांचा सवाल

सिंधुदुर्ग / राजू तावडे

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी नगराध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबाबत गौप्यस्फोट केला तो पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांच्या वारसा सांगून आणि धनशक्तीच्या जोरावर निवडून आलेल्याना लांचनास्पद आहे. टेंडर मिळवण्यासाठी राजवाड्यात जावे लागते हा आरोप म्हणजे ‘बड्या बड्या बाता अन् सामान्यांना लाथा’ अशी परिस्थिती आज सावंतवाडीची झाली आहे. असा आरोप माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
डॉक्टर परुळेकर पुढे म्हणाले, पालकमंत्री रोजगार व विकासाच्या घोषणा करीत आहेत. ६० ते ७० युवकांना रोजगार देणाऱ्या माणसाला सावंतवाडीत २०० स्क्वेअर खूप जागेसाठी १५ दिवसाला ६० हजार रुपये भाडे द्यावे लागले तर येथे रोजगार कसा निर्माण होणार व आपण कोणता विकास करणार? पालकमंत्र्यांनी म्हणाले, तुम्ही विरोधकांच्या टिकेकडे लक्ष देऊ नका. तुमची रेघ मोठी करा. ही रेघ विकासाची की भ्रष्टाचाराची? असा प्रश्न परूळेकर यांनी यावेळी केला.
पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा या संस्थानला असून सावंतवाडीत सुराज्य आणणारे राजे म्हणून त्यांचे जगात नाव आहे. आज संस्थानचे नाव खराब होत आहे याचे भान त्यांनी ठेवावे. सावंतवाडीच्या राजघराण्याचा गौरव देशाने केला आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांचा वारसा या संस्थानला आहे. जेव्हा दिवाबत्ती वर जग चालायचं तेव्हा इथे लाईट होती, १९२४ सालात कोठे रुग्णालय नसताना येथे महिलांसाठी रुग्णालय आहे. याचा विसर आताच्या पिढीला पडला नको. आज गॅस पाईपलाईनच्या कामात व नळ पाणी योजनेच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हा विकास हप्तेखोरीसाठी आहे का ? असा सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला.
मोती तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटीचा निधी मिळणार आहे. त्याची आता भीती वाटू लागली. सुशोभीकरणाच्या नावाखाली टक्केवारी खाऊन विद्रुपीकरण केले जाईल. जी सावंतवाडी व मोती तलाव नैसर्गिकरीत्याच सुशोभित आहे त्याचे तुम्ही काय सुशोभित करणार ? या तलावातील काही भाग बुजवण्याचा तर हि डाव नाही ना ? फुटपाथचे काम देखील निकृष्ट आहे. तुम्ही नगरपरिषदेचे विश्वस्त आहात, सावंतवाडीही सर्वात जुनी नगरपरिषद असून पालकमंत्री यांनी सांगितलेली मोठी रेघ भ्रष्टाचाराची ओढायची का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच राजघराण्याबाबत आम्हाला नितांत आदर असून त्याला पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज, शिवरामराजे कारण आहेत. मुख्यमंत्री होण्याची ताकद त्या व्यक्तीत होती. राजमाता सत्वशीलादेवींनी कलावंतांना राजाश्रय दिला. त्यांचा आदर्श आताच्या पिढीने घेतला पाहिजे. असे सांगून डॉक्टर परुळेकर म्हणाले, हिंदू धर्म कोणाला धमकावण्यासाठी नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे