न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी खरेदी-विक्री गैरव्यवहार चौकशीबाबत मनसे जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन; ॲड. अनिल केसरकर 

 

सिंधुदुर्ग /राजू तावडे 

   सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा करून निवेदन दिले जाणार आहे. यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी सोमवारी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी खरेदी-विक्रीच्या प्रकरणांमध्ये मनसेच्या वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सावंतवाडीत आयोजित बैठकीला मनसे तालुका प्रमुख मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत अतुल केसरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांमध्ये शेकडो एकर जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दिल्ली, हरियाणा, नोएडा तसेच परराज्यांतील खरेदीदारांकडून या भागात जमिनी खरेदी केल्या जात असून, या व्यवहारांची तसेच त्यासोबत जोडलेल्या शेतकरी दाखल्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रश्नावर आवाज उठवला होता. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली होती, तर कोकण आयुक्त रूबल अगरवाल यांनी सासोली येथे प्रत्यक्ष पाहणीही केली होती. त्याचे पुढे काय झाले याबाबत विचारणा केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

एसआयटी चौकशी समितीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. कोकण आयुक्त रूबल अगरवाल यांच्या सोबत त्यांनीही तक्रारीची चौकशी केली आहे या चौकशीत नक्की काय निष्पन्न झाले आणि काय कारवाई झाली, यावर प्रशासनाकडून स्पष्टता मिळण्यासाठी मनसेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देऊन कारवाईची जोरदार मागणी केली जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे