न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

काँग्रेस तर्फे २ ऑक्टोबरला सावंतवाडीत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

     शुक्रवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने पुष्पांजली व आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी दिली.

यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे नगरसेवक व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तौकीर शेख यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम उभा बाजार, ज्वेलरी पेठ, जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान, राजेंद्र मसुरकर यांचे कार्यालय, सावंतवाडी येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक, तालुका कार्यकर्ते, महिला काँग्रेस, सेवा दल, NSUI व अल्पसंख्यांक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर, रवींद्र मापसेकर, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते ॲड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सौ. साक्षी वंजारी व शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. सुमेधा सावंत यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे