मडगावला जाणारी जनशताब्दीत बिघाड… पेणमध्ये तीन तास थांबली
रायगड / प्रतिनिधी
मुंबईहून मडगावच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासात आज मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रेल्वेच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तब्बल तीन तासांपासून रेल्वे एकाच ठिकाणी उभी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून मडगावकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस सकाळी सुमारे सात वाजता पेण रेल्वे स्थानकात दाखल झाली. मात्र, त्यानंतर इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, बराच वेळ उलटूनही गाडी पुढे रवाना न झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.


