न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

जिल्ह्याच्या शैक्षणिक जडणघडणीत लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा: पोलीस निरीक्षक चव्हाण

 

सिंधुदुर्ग / राजू तावडे

   सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि व्यावसायिक जडणघडणीमध्ये लोकमान्य ट्रस्टचा मोठा वाटा

आहे. या ट्रस्टने या भागातील तरुण-तरुणींच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने बिझनेस मॅनेजमेंट व हॉटेल मॅनेजमेंट यासारखी कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन निर्माण केले आहे. देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज हे तुमच्या यशाचे शिखर उंचावणारे आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजच्या प्रथम वर्षाच्या बॅचचे फ्रेशर पार्टी कार्यक्रमात शुक्रवारी श्री चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार व कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव ॲड.संतोष सावंत, प्राचार्य यशोधन गवस उपस्थित होते.

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात जे यश मिळाले ते कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आनंदाने आपले शिक्षण कसे पूर्ण करता येईल हा विचार करून, ही पार्टी म्हणजे कॉलेजचा पहिला दिवस तुमचा आहे. आपली संस्कृती आज पाश्चात्य देश स्वीकारत असल्याने विद्यार्थ्यांनी पाश्र्चात्य संस्कृतीकडे आकर्षित न होता अभ्यासाकडे लक्ष देऊन आपले करिअर घडवा. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी ॲड. संतोष सावंत म्हणाले, प्रत्येक बाबतीत आपण व्यवस्थापन नियोजन करतो. त्यानुसारच आज आपण बारावीपर्यंत शिक्षण घेऊन तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचे करिअर योग्य दिशेने निवडले आहे. जगात बिजनेस मॅनेजमेंट हा असा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे की, जिथे तुम्हाला तुमच्या यशाच्या वाटा खुल्या आहेत. हा व्यवसायिक अभ्यासक्रम निवडून तुम्ही पहिली पायरी यशाची गाठली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यशोधन गवस यांनी केले तर सूत्रसंचालन दीक्षा काकतकर व गौरव गावडे यांनी केले. आभार प्रा. साईप्रसाद पंडित यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे