सावंतवाडी शहर भाजपा ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी धिरेंद्र म्हापसेकर
सिंधुदूर्ग/ / राजू तावडे
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये श्री. धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर याची सावंतवाडी शहर भाजपा ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले आहे.


