न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन  

सिंधुदुर्ग / राजू तावडे

  सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या वतीने आज रविवारी करण्यात आले होते. यात सावंतवाडी नगर परिषदेच्या नरेंद्र डोंगर येथील जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यासोबतच सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळकटी देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा आणि अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही पार पडला.

या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत – भोंसले, उप नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखमराजे भोसले, मुख्याधिकारी विनायक औंधकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी नगरसेवक उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार मेहर पडते आदी उपस्थित होते. यावेळी लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे