न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

नगरपरिषदेच्या माध्यमातून समाजमंदिरातील कार्यक्रमांसाठी कायम स्वरूपी तरतूद; उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर 

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

    अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची माहिती गोळा करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी प्रामाणिकपणे केले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर जाऊन समाजाचे प्रतिनिधित्व करत समाज नेतृत्व जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, असे उद्गार सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी काढले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून समाजमंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कायम स्वरूपी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कार्यक्रमांसाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज नाही, असे ॲड. निरवडेकर म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेतर्फे सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी सत्कार व स्नेहमेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. निरवडेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण होते.

यावेळी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच समाजातील ज्येष्ठ व निवृत्त नागरिकांचाही शाखेतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात विजय चव्हाण म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी आता पुढील शिक्षण घेऊन एमपीएससी, यूपीएससी परीक्षांद्वारे अधिकारी बनावे आणि समाजाच्या मान उत्कर्षासाठी प्रयत्न करावेत. आमची कौतुकाची थाप कायम त्यांच्या पाठीशी राहील.

कार्यक्रमाचे उद्घाटन अभियंता विजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधीर जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, नामदेव चव्हाण, नरसू रेडकर, ऋषिकेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, जिल्हा समन्वयक बाबुराव चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप इन्सुलकर, माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर तळकटकर, तालुका सचिव जगदीश चव्हाण, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश तिवरेकर, लक्ष्मण आरोसकर, संजना चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, विजय ओटवणेकर, सुधाकर बांदेकर, शांताराम पवार, एकनाथ चव्हाण, संभाजी कांबळे, नरेश कारिवडेकर व कल्याण कदम आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संजना चव्हाण यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे