न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गाबीत समाजाने शिक्षण व रोजगारासाठी चळवळ उभारावी; माजी आमदार परशुराम उपरकर 

 

सिंधुदुर्ग  राजू तावडे

    संपूर्ण महाराष्ट्रात गाबीत समाज हा असा समाज आहे कि, इतर समाजापेक्षा या समाजाला निसर्गतः समुद्र किनारपट्टीची देणगी लाभली आहे. त्याचा लाभ घेऊन गाबीत समाजातील लोकांनी समुद्री पर्यटन प्रकल्प राबवून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे गाबीत समाज संघटनांनी शिक्षण व रोजगारासाठी चळवळ उभारावी असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.

अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे दोन दिवसांचे चिंतन शिबीर पनवेल येथील एम. जे. रिसॉर्ट येथे आयोजित केले होते. यावेळी श्री. परशुराम उपरकर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष श्री. सुजय धुरत, विश्वस्त श्री. मदन जुवाटकर, श्री. शंकर पोसम, सरचिटणीस श्री. बाळा मणचेकर, गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष श्री. हरिश्चंद्र खोबरेकर, अंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन अभ्यासक डॉ. श्याम चौगुले, कोलंबी उद्योजक ॲड. काशिनाथ तारी, उद्योजक श्री. नंदकुमार हरम, श्री. नारायण आडकर, श्री. रतनकुमार झाजम हे उपस्थित होते.

यावेळी गाबीत समाजाचे संघटक व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी गाबीत समाजातील राज्यस्तरीय संघटन आणि प्रशासकीय बाबी यांवर प्रबोधनात्मक विचार मांडले. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील गाबीत समाजातील जडणघडण, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, किनारपट्टीवरील नैसर्गिक संकटे, गाबीत समाजातील लोकांचे जातपडताळणीचे प्रश्न, राहत्या घरांचे प्रश्न, मासे विक्रे्त्या महिलांचे प्रश्न,केंद्र व राज्य शासकीय अनुदानाच्या सवलती मिळविणे, वधू – वरांचे विवाहविषयीच्या अडचणी दूर करणे, गाबीत समाजातील लोकांनी खाडी व समुद्र किनारी पर्यटन उद्योग राबविणे वगैरे अनेक विषयांवर सविस्तर मुक्त संवाद साधण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठया संख्येने देवगड भागात गाबीत समाजाची लोकवस्ती असून येथील आंबा आणि मासेमारी व्यवसायावर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून शासनाने होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पा बाबत अणुऊर्जा तज्ञाना आणून गाबीत वस्तीच्या गावात बैठका घेऊन भविष्यातील संकटाची जाणीव लोकांना करून देण्याचे ठरविण्यात आले. देवमाशांच्या उलटीबाबत योग्यतो प्रयोगशाळा तपासणी अहवाल येईपर्यंत तस्करी विषयक केसीस दाखल करू नयेत यासंबंधि पोलीस कमिशनर यांची भेट घेऊन निवेदन देण्याचे ठरले.

या शिबिरासाठी श्री. वामन आडकर-अध्यक्ष भांडुप पश्चिम, डॉ. अनिल पराडकर अध्यक्ष – रायगड विभाग, श्री. संजय पराडकर, अध्यक्ष -देवगड, श्री. गणेश ऊर्फ बंटी पाटील, अध्यक्ष – वडाळा विभाग, श्री. संकेत कोळंबकर- अध्यक्ष पुणे विभाग, श्री. रामचंद्र सारंग अध्यक्ष – मानखुर्द-गोवंडी – चेंबूर, सौ. आकांक्षा केळुस्कर – महिला आघाडी रायगड,सौ. सुप्रिया सारंग महिला आघाडी डोंबिवली, सौ. प्रियांका खोबरेकर व सौ.प्रेरणा सरवणकर कांजूरमार्ग विभाग आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या सर्व गाबीत समाज पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. सुजय धुरत यांनी मांडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे