जळगावात गुटखा विक्रीसाठी आणताना बुलढाणा जिल्ह्यातील दोघांना अटक
जळगाव/ वृत्तसंस्था
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. त्यात एका वाहनात ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा गुटखा, वाहन आणि मोबाइल मिळून १२,०६,९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बुलडाणा जिल्ह्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या मोहिमे दरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, तस्करीसाठी वापरली जाणारी कार आणि दोन मोबाइल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना घटना स्थळावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे


