आम्हाला तुमच्या पासून नको पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपासून संरक्षण द्या … मुंबईत महिलेची पोलीसांना आर्त विनवणी
मुंबई/ वृत्तसंस्था
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन सुरू होते. याच आंदोलनादरम्यान या महिलेचा हा संताप पाहायला मिळाला.
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. मी घोषणा दिल्या नाही. गाणं म्हटलेलं नाही. तरी इथून जा असं सांगितलं आहे. इथं उभं राहायचं नाही असं सांगितलं जातंय. आम्हाला मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासून संरक्षण द्या, असं संताप या महिलेने व्यक्त केला. तसेच आम्ही तुमच्याकडे जेव्हा संरक्षण मागायला येतो तेव्हा चार-चार तास बसवून ठेवता. आता आम्ही आमच्या हक्कांसाठी उभे राहिलो आहोत, तर आम्हाला संरक्षण देताय. आम्हाला तुमचे संरक्षण नको आहे, असंही या महिलेने पोलिसांना ठणकावून सांगितले आहे.


