अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न,.ॲड. अनिल केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
देवगड येथील अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न असून
आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा पोलिसांनी दिल्या आहेत. प्रकल्प पुढे रेटून नेण्यासाठी सरकारचा हा दुपट्टी खेळ आहे, अशी टीका मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
देवगड येथे आयोजित करण्यात आलेल्या अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याच्या नोटीसा देण्यात आल्या असून हे आंदोलन दडपण्यासाठी सरकारी यंत्रणा आता पोलिसांची मदत घेत असल्याचे दिसून येत आहे. सनदशीर व लोकशाहीच्या मार्गाने आपल्या न्याय मागण्यासाठी शेतकरी, आंबा काजू बागायतदार , मच्छीमार बांधव हा लढा उभारत आहेत या सर्वांना सामोरे जाण्याचे सोडून हे आंदोलन दडपून टाकण्याची व आंदोलकर्त्यांवर दबाव आणण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र शेतकरी व सर्वसामान्य जनता या दबावाला बळी पडणार नाही. असे श्री. केसरकर म्हणाले. विधिमंडळात उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी अद्याप जागा निश्चित करण्यात आली नसल्याचे सांगितले आहे. तर खासदार महोदय या प्रकल्पाला कोण विरोध करतो तेच मी बघतो अशा धमक्या देत आहेत. हे दुपट्टी धोरण राबवून प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर खेळला जात असल्याची टिका मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.


