एस.टी. ट्रक अपघातात २२ प्रवासी जखमी
चंद्रपूर/ वृत्तसंस्था
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव जाट गावाजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन २२ प्रवासी जखमी झाले. या अपघातात ६ जण गंभीर तर १६ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. राजूराकडून तुमसरकडे जात असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी मदतकार्य राबवून जखमींना तातडीने सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास सुरू आहे.”


