दगड खाणीत दगड कोसळून ९, मजूरांचा दुर्दैवी मृत्यू
बंगळुरू/ विनूथा के आर
बंगळूर दक्षिण तालुक्याच्या मदापटना भागातील एका दगड खाणीत गुरुवारी सकाळी एक मोठी दरड कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून ९ मजूरांचा मृत्यू झाला तर तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व मजूर बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाणीत दगड फोडण्याचे आणि उत्खननाचे काम सुरू असताना अचानक पहाटेच्या वेळी ही दुर्घटना घडली. तेथे उपस्थित असलेल्या एका कामगाराने सांगितले की, सुमारे १८ मजूर काम करत असताना अचानक सुमारे ४० फूट उंचीवरून त्यांच्यावर एक मोठा दगड कोसळला. या घटनेत मृत्यू झालेले सर्वजण स्टोन क्रशर साइटवर रोजंदारीवर काम करणारे मजूर होते
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. ढिगारा हटवून अनेक जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले.


