अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली… रोहा आणि नागोठणे शहराला पुराचा धोका
रायगड/ वृत्तसंस्था
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील नागोठणे येथील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार अंबा नदीची सध्याची पाणीपातळी ८.५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून इशारा पातळी ८.०० मीटर आहे.


