न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

स्मार्ट मीटर’ विरोधात मालवणात यल्गार

सिंधुदुर्ग / राजू तावडे

स्मार्ट मीटर’ विरोधात मालवण येथील वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी आक्रमक भुमिका घेत महावितरण कार्यालयावर धडक दिली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही!असा ठाम निर्धार वायरी-भूतनाथ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात महावितरणला ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत तेथे दुप्पट-तिप्पट बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. सध्याचे डिजिटल मीटर्स सुरळीत सुरू असताना नवीन मीटर सक्तीने बसविल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महावितरण जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे