संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त मनमाडात रथयात्रा
नाशिक/ वृत्तसंस्था
संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आज मनमाड शहरातून समस्त शिंपी समाजाकडून भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान “ज्ञानोबा-तुकोबा”, “जय हरी विठ्ठल” चा जयघोष करण्यात आला.तर विविध वेशभूषा करून लहान मुले सहभागी झाले होते,तर रथ यात्रा मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते”


