ईन्सुलीतील तरूणाचा आंबोलीत बुडून मृत्यू
सिंधुदुर्ग / राजू तावडे
आंबोलीतील सतीचिवाडी येथील चिरेखाणीत बुडून संजय लक्ष्मण गावंकर (वय ५०, रा. इन्सुली) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. संजय गावंकर हे माजगाव व इन्सुली येथील काही सहकाऱ्यांसोबत पर्यटनासाठी आंबोलीत आले होते. सतीचिवाडी येथील चिरेखाणीतील खोल पाण्यात ते बुडाले
सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली व सांगेली रेस्क्यू टीमला माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खोल पाण्यात शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. अजित नार्वेकर यांनी खोल पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या बचावकार्यात सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली व सांगेली रेस्क्यू टीमचे सदस्य अजित नार्वेकर, राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी मदत केली. दरम्यान, आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार लक्ष्मण काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


