सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मनसेचा राडा….जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना तातडीचे उपचार होत नसल्याने आज रविवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घुसून राडा केला. ड्यूटीवर हजर असलेल्या डॉक्टरांना रुग्ण कशासाठी दाखल आहे याचा देखील जाणीव नाही असे विधारक चित्र यावेळी त्यांच्या निदर्शनास आले. यावर कहर म्हणजे जेथे रुग्ण उपचार घेत आहेत तेथेच आज सकाळी जीवंत साप आढळून आला. उपजिल्हा रुग्णालयाचा हा कारभार सुधारला नाही तर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांबाबत पालकमंत्री व आमदार यांना मनसे घेराव घालून जाब विचारणार असल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिली. लोकांना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची स्वप्न दाखवणारे सत्ताधारी टक्केवारीत अडकले असल्याची टीका यावेळी श्री. केसरकर यांनी केली
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाया आज मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धडक दिली आणि पालकमंत्री, आमदार लोकांना कसे मूर्ख बनवत आहेत याची पोलखोल केली. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना तातडीचे उपचार देण्यात येत नाहीत अशी तक्रार तेथे दाखल असलेल्या अनेक रुग्णांनी बोलून दाखवली. या ठिकाणी आज सकाळी जेथे रुग्ण उपचार घेत आहेत तेथे जिवंत साप आढळून आला व रुग्ण व नातेवाईक हादरून गेले. हा सर्व प्रकार संतापजन असल्याची भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरली असल्याचे यावेळी निदर्शनास आले. दरम्यान या रुग्णालयाचा कारभार सुधारा अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, राजू कासकर, चिन्मय नाडकर्णी, सुनील आसवेकर, अतुल केसरकर, राकेश परब, राजेश मामलेकर , काशीराम गावडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


