न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या छत्री वाटप कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

  भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत.

समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विशाल परब यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने योगदान देत त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना आधार, युवकांना प्रोत्साहन तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

जनहिताच्या भूमिकेतून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत छत्री वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजातील गरजू घटकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे. सत्ता किंवा पदाची अपेक्षा न ठेवता समाजहिताचा ध्यास घेऊन विशाल परब यांनी हे कार्य केले आहे.

यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, गुरु कल्याणकर, दादू कविटकर, बाळा आकेरकर, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, सदा राणे, प्रवीण पंडित, निलेश पटेकर, बाळा पेडणेकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर, मनोज कल्याणकर, बापू कदम उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे