बांदा शहरातील मोतीराम उर्फ गुंडु येडवे आणि नाथा विर्नोडकर यांचे निधन
सिंधुदुर्ग /प्रतिनिधी
बांदा उभाबाजार येथील मोतीराम राघोबा उर्फ गुंडु येडवे (वय ५१) यांचे शुक्रवारी हृदय विकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. शनिवारी सकाळी बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते उत्कृष्ट फलंदाज तथा श्री हनुमान सेवक मंडळ बांदाचे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात मुलगा, भाऊ, बहीणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नाथा विरनोडकर यांचे निधन
बांदा उभाबाजार येथील जगन्नाथ उर्फ नाथा शिवराम विरनोडकर (वय ६८) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. बांदा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.


