भाजपा नगरसेविका दुलारी रांगणेकर यांच्या कडून सात वर्षांच्या गरीब मुलाला २७५००रुपयाचे श्रवण यंत्र वाटप
सिंधुदुर्ग /प्रतिनिधी
मुंबईतील नामांकित डी एन वाय सोल्युशन्स (DNY Solutions) तर्फे मोफत श्रवण तपासणी शिबिर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सावंतवाडी, उभा बाजार, गणेश होमिओ क्लिनिक येथे आणि दुसऱ्या रविवारी डॉ गणपत्यें यांच्या धन्वंतरी हॉस्पिटल, माणगाव येथे आयोजित करण्यात येते.
TV मोठ्या आवाजात ऐकणे, फोनवर ऐकू न येणे, आवाजाची दिशा न समजणे, फोनची दरवाज्याची बेल ऐकू न येणे, मोठ्याने बोलणे यापैकी कोणतीही लक्षणे असल्यास तुम्ही शिबिराचा लाभ घेऊ शकता.
शिबिरामध्ये श्रवणदोष तपासणी करून तुम्हाला श्रवणदोष असल्यास श्रवण यंत्राची मोफत ट्रायल देण्यात येते मशीन हवे असल्यास भरपूर सवलत देण्यात येते शिवाय बजाज फायनान्स तर्फे झिरो कॉस्ट ईएमआय सुद्धा उपलब्ध आहे. गरीब लोकांना मोफत श्रवणयंत्र देण्यात येते. असेच आज दिनांक 11 एप्रिल रोजी झालेल्या शिबिरात 7 वर्षाच्या गरीब मुलाला येथील नगरसेविका सौ दुलारी रांगणेकर यांच्या हस्ते 27500/- रुपयाचे मशीन मोफत देण्यात आले.


