खास. नारायण राणे यांना वाढदिवसा निमित्त माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसलेंनी दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य मंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त आज शुक्रवारी माजी राज्य मंत्री प्रवीण भोंसले यांनी श्री. राणे यांची कणकवली येथे त्यांच्या ओम गणेश या निवास्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच या पुढे ही खासदार नारायण राणे यांच्या कडून सिंधुदुर्ग जिल्हाचा सार्वोभोम विकासाचे कार्य घडो व त्यांना चांगले आरोग्य लाभो अश्या भावना श्री. भोसले यांनी व्यक्त केल्या. तसेच या वेळी सौ. नीलमताई राणे यांच्या उपस्थितित अरुण तिवारी लिखित, ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे संपूर्ण जीवन हे पुस्तक भेट दिले.


