न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

गेळे येथील पर्यटन स्थळांचा विकासाच्या उद्देशाने कबुलायतदार गावकर जमिनीचे वाटप

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

गेळे येथील पर्यटन स्थळे विकसित करून येथे रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने शासनाने कबुलायतदार गावकर जमिनी वाटप केल्या आहेत. कमर्शियल आणि शेती विषयक उपक्रम हाती घेण्यासाठी जमिनी वाटप करताना मला आनंद होत आहे. सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले आहे.आता चौकुळ आणि आंबोली येथील जमिनी भूमिअभिलेख मार्फत मोजून घेवून वन संज्ञा जमिनी सह जमिनी वाटप करण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केले.
गेळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि गेळे येथे शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमिनी वाटप समारंभ आज शुक्रवारी आयोजित केला होता. या प्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार श्रीधर पाटील, सभापती सुष्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच सागर ढोकरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, दाणोली पंचायत समिती सदस्य सुर्यकांत सुकी, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, उपसरपंच विजय गवस आदी उपस्थित होते.
आमदार दीपक केसरकर म्हणाले,सिंधू रत्न योजनेतून पर्यटनासाठी बंगले मंजूर केलेले आहेत तसेच गेळे ,चौकुळ व आंबोली भागात करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. सध्या चौकुळ व आंबोली ग्रामपंचायतला प्रकल्प दिलेले आहेत. या भागात दरवर्षी सुमारे तीन लाख पर्यटन येतात. त्या पर्यटकांना पायाभूत सुविधा आणि पर्यटनासाठी सुविधा मिळाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेळे येथे साहसी क्रीडा स्पर्धांसाठी प्रकल्प हाती घेणार आहे. त्यामुळे नक्कीच पर्यटक वाढतील आणि या पर्यटकांसाठी गेळे , आंबोली व चौकुळ भागामध्ये रीघ लागेल. गेळे गावातील लोकांनी जमिनी मिळाल्या आहेत त्यांचा योग्य वापर करून पर्यटक निवास देखील करावीत. याशिवाय या भागात देशी गायीच्या प्रकल्प हाती घेतलेला आहे. एवन दुधाला मोठी मागणी आहे. त्यासाठी दूध डेरी देखील करण्याचा प्रयत्न आहे. बचत गटांनी देखील यामध्ये प्राधान्य घ्यावे असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
कबुलायतदार गावकर जमिनी चा प्रश्न निकाली लागण्यासाठी माझ्या सह पालकमंत्री नितेश राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण अशा सर्वांचे सहकार्य लागले लाभलेले आहे. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा दिवशी जमिनी वाटप होत आहे हा आनंद द्विगुणित झाला आहे.याशिवाय जिल्हा परिषद संदीप गावडे यांनी देखील यासाठी प्रयत्न केलेले आहेत असे आमदार दीपक केसरकर म्हणाले. चौकुळ, आंबोली व गेळे गावातील वन सदृश्य जमीन सुटेपर्यंत लढा सुरू राहणार आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले,शक्तीपीठ मार्ग देखील या परिसरातून जाणार आहे त्याचा फायदा देखील होईल. वन्यप्राणी शेतकऱ्यांना त्रास देत आहे त्याबाबत मी वनमंत्र्यांशी बोललो आहे.
कबुलयतदार गावकर जमिनी आराखडा तयार करणाऱ्या आरती गावडे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांचा सत्कार आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. ते म्हणाले,कबुलायतदार गावकर जमिनी ताब्यात देताना सातबारा उतारा आणि महसूल कागदोपत्री नोंद करण्यात आली.
सातबारा उतारा वाटप विरपत्नी सिताबाई गवस (नेतर्डे) , मनोहर बंड, काशिराम गवस, महादेव नार्वेकर, अर्जुन कदम, उत्तम कदम, धोंडी कदम, महादेव पवार ,व अन्य शेतकऱ्यांना करण्यात आले.
सरपंच सागर ढोकरे व उपसरपंच विजय गवस यांनी स्वागत केले. यावेळी तातोबा गवस,मनोहर बंड, आनंद गावडे, नितीन गवस, बाळा गवस, आरती आनंद गावडे, पी डी गावडे, शशिकांत गावडे यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे