आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस… नारायण राणे
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
माझ्या वाढदिवसाला वेळ काढून आलेल्या माझ्या राजकीय मित्रांनी माझ्या बाबतीत मी केलेल्या चांगल्या कामाबद्दल भावूक होऊन जे स्तुतीसुमने गायली..त्या बद्दल मी फार आनंदी असून आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे भावोद्गार खासदार नारायण राणे यांनी अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त कार्यक्रमात काढले.
कोंकणचा वाघ असलेल्या खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आज कणकवलीत साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नितीन गडकरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत,आशिष शेलार, सुनील तटकरे, दीपक केसरकर, नितेश राणे, निलेश राणे, पत्नी निलमताई, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना दादांनी भावूक होत आपल्या जडणघडणीत बाळासाहेबा़चे मोठं योगदान आहे असे सांगून जून्या आठवणीत रमले. राजकारणात मी कधीही पक्ष न पाहता समोरील व्यक्तीच्या भविष्यासाठी नेहमी मदत केली त्यावेळी कुठल्या पक्षाचा तो आहे हे मी पाहिलं नाही.
नारायण राणे यांनी यावेळी आपल्या कार्याचा गौरव का केला हे माझे दोन्ही मुलांनी पाहिले.आणि हू पाहून माझ्या पेक्षाही चांगलं काम ते करतील असा विश्वास व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले.


