न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

माझ्या यशात नारायण राणेंचा वाटा: देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग/ राजू तावडे 

 नारायण राणे हे गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा मुख्यमंत्री असा संघर्षमय प्रवास करणारे नेतृत्व आहे. वरून काटेरी वाटले तरी अंतःकरणातून ते कोकणी फणसासारखे मऊ आणि दिलदार आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा गौरव केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, माझ्या संसदीय यशाचे श्रेय राणे साहेबांना जाते. विधानसभेतील माझ्या पहिल्या भाषणानंतर त्यांनी अवघ्या ७ मिनिटांत कौतुकाची चिठ्ठी पाठवून माझा उत्साह वाढवला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. जेव्हा राणे साहेब अर्थसंकल्पावर बोलायचे, तेव्हा एखादा अर्थतज्ज्ञ बोलतोय असे वाटायचे. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे तत्कालीन अर्थमंत्रीही चिंतेत पडायचे.”
फडणवीस म्हणाले, नारायण राणे यांच्या मनात सदैव कोकणच्या विकासाचा विचार असतो. त्यांच्या मेडिकल कॉलेजमधून १५० डॉक्टर बाहेर पडले, हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्यांनी सत्तेचा वापर नेहमी गरिबांचे संसार उभे करण्यासाठी केला.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे