न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात हजर…आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

 

सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जिल्ह्यात येऊन काम करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात केली होती, त्यानंतरवाज संबंधित खात्याचे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस जिल्ह्यात थांबून प्रत्येक तालुक्यात जाऊन हे अधिकारी दशावतार कलाकारांच्या भेटीगाठी घेऊन नोंद गोळा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे