कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडला
सिंधुदुर्ग / राजू तावडे
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली आहे.
वेताळबांबर्डे येथील एका ग्रामस्थांच्या घराशेजारील विहीरीत भक्ष्याच्या शोधात असलेला हा बिबट्या पडला होता.
याची माहीती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळावर दाखल झाली.


