कुडाळात बिबट्याच्या संशयित नखांना जवळ ठेवल्यामुळे सुवर्णकारास अटक
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बिबट्याची सहा नखांसह कुडाळातील एका सुवर्णकाराला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. अजित मसुरकर असे सुवर्णकाराचे नाव आहे. त्यांच्याकडे अन्य प्राण्याचीही नखे सापडलीत. या नखांची पुष्टी करून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.